विवेकवाद हा संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा मूलाधार होता. – प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य*         

लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत

जिवती ÷ महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची जडणघडणच मुळी संतांच्या विचारातून झाली आहे. त्याचा शिकवणुकीचा आधार घेऊन विदर्भ कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमा चे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस.एच. शाक्य यांनी संत सेवालाल महाराजांच्या विचारावर प्रकाश टाकताना विवेकवाद हा संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा मूलाधार होता असे मत व्यक्त केले. तसेच प्रा. डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी ‘जाळंजो, छाळणजो पचच मानजो’ असे संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे कोटेशन देऊन विद्यार्थांनी विद्यार्थी दशेत संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा अंगीकार केला तर तो देशाचा सुज्ञान नागरिक म्हणून उदयास येईल असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला प्रा. देशमुख प्रा. लांडगे प्रा. साबळे प्रा. मुंडे प्रा. मंगाम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. चतूरदास तेलंग यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गजानन राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थांनी सहकार्य केले.

प्रा. गजानन राऊत
9767584069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here