शिवजयंती निमित्ताने गडचांदूर येथे 18 फेब्रुवारी भव्य आरोग्य शिबिर। 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्थानिक डॉ, प्रदीप खेकडे यांच्या रुग्णालयात 18 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता मोफत हृदय रोग, कॅन्सर, व दंत रोग निदान व उपचार शिबिर व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत,
जनरल मेडिकल प्रॅक्टिष्णर असोसिएशन गडचांदूर, कोरपना, आचार्य विनोबा भावे संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे वर्धा व वाइल्ड लाईफ ईनवारमेंट कानझरवेशन नेचरिंग फौंडेशन गडचांदूर व नगर परिषद गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुपर स्पेशालिटी कॅम्प मध्ये तज्ज्ञ डॉक्टर कडून तपासणी करून बी,पी,शुगर मोफत तपासणी करण्यात येईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत ई, सी,जि, काढून मिळेल,
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ह्रदय रोग व कॅन्सर रोगावर सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत,
नोंदणी व अधिक माहिती साठी डॉ, प्रविण लोनगाडगे,डॉ, प्रदीप खेकडे, डॉ, पंकज देरकर,डॉ, कुलभूषण मोरे,डॉ, दीपक मेश्राम, डॉ, डाखरे,डॉ, विशाल धोटे यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here