14 फेब्रुवारी. व्हॅलेंटाइन डे : च्या निमित्ताने

.लोकदर्शन 👉.. साहेबराव माने.
9028261973

=======================

मित्रांनो आणि मैत्रिणींनोही,
प्रेम ही खूप निर्मळ भावना आहे.

आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम बसणं यासारखा सुंदर अनुभव अनुभव नाही.
त्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम करावे हाही नैसर्गिक भाव आहे.

पण तिने आपल्यावर आणि आपल्यावरच प्रेम केले पाहिजे यासारखा वाईट विचार नाही.

मी ज्या व्यक्तीवर प्रेम करत नाही अशी एखादी व्यक्ती माझ्यावर प्रेम करू शकते.
तसेच जिच्यावर मी प्रेम करतो ती कदाचित माझ्यावर नाही प्रेम करणार.
त्यामुळे माझे त्या व्यक्तीवरील प्रेम कमी होण्याची किंवा हिंस्र होण्याची गरज नाही.

लक्षात घ्या…
प्रेम कधीच हिंसक असू शकत नाही.
जे हिंसक असतं ते कधीच प्रेम असू शकत नाही.

आपल्याला कुणीतरी आवडतं म्हणून आपण तिच्यावर अमर्याद प्रेम करावं,
पण तिला आपण आवडत नसू तर तिच्या भावनांचा पूर्ण आदरही आपण ठेवावा.

तू मला आवडतेस हे सांगण्याची येथे भीती नसावी
आणि मीही तिला आवडलोच पाहिजे असं म्हणण्याची सक्तीही नसावी.

ती मला आवडावी, तिला दुसरं कुणी,
आणि दुसऱ्याला तिसरं कुणी,
तरीही प्रत्येकाने गावीत आपापल्या प्रेमाची मंजुळ गाणी…

*व्हॅलेंटाईन दिनाच्या सर्वांना आभाळभर सदिच्छा!*
… साहेबराव माने.
पुणे. 9028261973

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here