महामार्गावरील बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करा रोहन काकडे यांची मागणी

गडचांदूर : गडचांदूर शहरातील मुख्य मार्गावरील दुभाजकावर लावण्यात आलेले स्ट्रीट लाइट्स अनेक दिवसापासून बंद असून त्यामुळे शहरात अंधार पसरला आहे ,तरी नगरपरिषदनी त्वरित पथदिव्याची दुरुस्ती करून अंधार दूर करावा अशी मागणी भाजपा युवा मोर्च्याचे तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी केली आहे .
गडचांदूर शहराच्या च्या शोभेत भर म्हणून नगरपरिषद मार्फत शहराच्या मुख्य मार्गावरील दुभाजकावर सुंदर स्ट्रीट लाइट्स लावून गडचांदूर ची शोभा वाढविली परंतु सध्यस्थितीत दुभाजकावरील बरेचसे स्ट्रीट लाइट्स दुर्लक्षित धोरणामुळे बंद पडलेले आहे . याकडे नगरपरिषदने विशेष लक्ष घालून सदर दुभाजकावरील सर्व स्ट्रीट लाइट्स चालू करून रस्त्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे त्याच प्रमाणे मुख्य मार्गावर वारंवार धुळीचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळत असून धुळीमुळे रहदा-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . योग्य उपाय योजना करून सदर रस्त्यावरील डस्ट नियंत्रणात आणावे त्याचप्रमाणे सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने उभी असतात यामुळे अपघातही होऊ शकतो करिता पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांनी संयुक्त उपक्रम राबवून उभ्या वाहना बाबतही योग्य उपाययोजना करावी. अशी मागणी मुख्याधिकारी नगरपरिषद गडचांदूर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here