

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर
खरसुंडी दि . ८ फेब्रुवारी २०२२
मॅट आणि मातीत मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी कुस्त्या करणारे पैलवान आणि खिलार जनावरांचे उत्कृष्ट पारखी , भजन किर्तनाचे व्यासंगी, खरसुंडीचे सुपुत्र पैलवान लक्ष्मणआण्णा भगवानराव पुजारी यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
दिवंगत आमदार बिजली मल्ल पैलवान संभाजीराव पवार यांच्या काळातले आणि त्यांच्याच जोडीचे पैलवान म्हणून पैलवान लक्ष्मणआण्णा पुजारी ओळखले जात .बेणापूरचे प्रसिध्द पैलवान श्रीरंगआण्णा शिंदे, रावसाहेबआण्णा शिंदे, मालोजीआबा शिंदे, करंजेचे पैलवान भीमराव माने, खरसुंडीचे पैलवान मारुती भांगे,पै.शंकर यादव, पै.विठोबा शितोळे यांचे समकालीन पैलवान म्हणून पंचक्रोशीत त्यांची खास ओळख होती . ख्यातनाम पैलवान आणि खरसुंडीचे ५० वर्षे नेतृत्व करणारे माजी सरपंच सितारामबापू पुजारी यांचे ते धाकटे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस विजयराव पुजारी यांचे तसेच खरसुंडीच्या माजी सरपंच सौ.अंजली पुजारी यांचे ते पिताश्री होत .
श्री . सिद्धनाथांचे सेवेकरी असलेल्या पुजारी परिवारातल्या पैलवान लक्ष्मणआण्णा पुजारी यांनी सदाचार, प्रेमळ वृत्ती आणि धार्मिक सद्भावनेतून सर्वधर्मीय मोठा मित्र परिवार जोडला होता .
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीस नेले जात असतानाच भिवघाट येथे त्यांची प्राणज्योत मालवली . ते ८४ वर्षाचे होते . पैलवान लक्ष्मणआण्णा पुजारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना, भावजयी, पुतणे, पुतणी, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या रक्षा विसर्जनाचा धार्मीक विधी खरसुंडी पोलीस स्टेशन जवळच्या ओढा पात्रातील स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी ७ . ३० वाजता होणार आहेत .
पैलवान लक्ष्मणआण्णा पुजारी यांच्या निधनाने दुःखी झालेल्या विजयराव पुजारी आणि परिवाराचे सांत्वन करून माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, राज्याचे युवक नेते प्रतिकदादा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अँडव्होकेट बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेबबापू पाटील विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी कार्यकारी अभियंता पी. एम . वाघमारे, राष्ट्रवादीचे मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादीचे मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशचे सचिव प्रा . एन . पी . खरजे, पश्चिम भागाचे नेते विलासराव नाना शिंदे, शशिकांत भोसले,
महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिताताई पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा सौ. अश्विनीताई पाटील, खरसुंडीचे माजी सरपंच चंद्रकांत पुजारी, माजी सरपंच शशिकांत देठे, माजी सरपंच दिनकरराव जावीर, विद्यमान सरपंच सौ.लता अर्जून पुजारी इत्यादी अनेक मान्यवरांनी कै पुजारी यांना श्रध्दांजली वाहीली .