चुनाळा येथे धान्य साठवणूक इमारत बांधकामाला सुरूवात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा चुनाळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अन्नधान्य साठवणूक इमारत बांधकाम करणे, किंमत २८ लक्ष रुपये निधी च्या कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या माजी आमदार सुदर्शन निमकर, सभापती मुमताज जावेद अब्दुल, प स सदस्य तुकाराम माणूसमारे, कुंदाताई जेनेकर, सरपंच बाळू वडस्कर, श्याम गरडे, केशव वांढरे, सुरेश सिनकर,जगदीश वांढरे, राजू झाडे, रमेश वाकुडकर, अविनाश मासिरकर, ग्रा प सदस्य रवि गायकवाड, राजू किनेकर, राकेश कार्लेकर, वंदना पिदुरकर, संतोषी साळवे, निखाडेताई, आत्राम बाई, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, अभियंता खापने यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here