नांदाफाटा येथील अपघातात भाजीविक्रेत्या महिलेला गंभीर दुखापत।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,

मदत करण्याऐवजी काढला पळ
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
औद्योगिक नगरी नांदाफाटा येथे काही दिवसापासून अपघाताची मालिकाच सुरु आहे मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुनिता शिंदे भाजीपाला विक्रेती आपला चारचाकी ठेला घेऊन नांदाफाटा चौकाकडे जात असतांना गडचांदूरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटारसायकलस्वाराने मागून सुनीता हिला जोरदार धडक दिली यात सुनीता या महिलेला गंभीर दुखापत झाली असून पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहेत अपघातग्रस्त महिलेला उपचारार्थ दवाखान्यात पाठवण्याऐवजी मोटारसायकलस्वाराने पळ काढला घटनास्थळी पोलीसांनी पोहोचून महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे नांदा येथील पोलीस पाटील यांच्या सुचनेवरुन याप्रकरणात गढचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार सत्यजित आमले तपास करीत आहे

 

नांदाफाटा येथे भाजीपाला व्यवसाय करणार्‍या सुनीता लक्ष्मण शिंदे भाजीपाला विकण्याकरीता बाजारपेठेत जात असतांना पहाटेच्या सुमारास अपघात झाला सुनीता शिंदे हिची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहेत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत असलेले पांडुरंग खिरटकर हे गडचांदूर वरून A शिफ्ट मध्ये ड्युटी असल्याने त्यांचे मोटारसायकलने येत होते नांदाफाटा बाजारपेठेत पहाटेला अपघात घडला पांडूरंग खिरटकर यांनी मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने सुनिता शिंदे हिचे पायाला जबर मार बसला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले घोटी जवळची हड्डीचे तुकडे झाले पांडुरंग खिरटकर हे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे स्थायी नोकरीवर आहेत परीसरात त्यांचा मोठा परीचय आहे अपघातग्रस्त महिलेला मदत करून उपचारार्थ दवाखान्यात पाठविण्याऐवजी पांडुरंग खिरटकर यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे व्हिडिओ फुटेजवरून दिसते

चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सुनिता शिंदे हिचेवर उपचार सुरू आहेत त्यांचे आज ऑपरेशन आहेत

नांदाफाटा येथील काही राजकीय लोकांनी मध्यस्थी करत त्यांना उपचाराकरीता आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासित करुन उपचाराकरिता चंद्रपूर येथे रवानगी करून दिली

आर्थिक मदत न मिळाल्याने बुधबारी वॉर्डातील महिला पुरुष राजकीय नेत्यांच्या घरी गेल्या होत्या परंतु आता पोलीस केस झाली आहे कोर्टात केस गेल्यावर मदतीचे बघु असे सांगत आहे नाहीतर तुम्ही अपघात करणार्‍यांच्या घरी जाऊन बसा असे सांगण्यात आले कुठलीही मदत मिळाली नाही उलट खाली हात परतावे लागले सुनिता शिंदे आता फार अडचणीत आल्या आहेत

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *