शेतकरी दुप्पट उत्पन्नाचा फुसका बार÷ संजय शिंदे

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

बीड ;

शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी निराशजनक अर्थसंकल्प सादर करून दुप्पट उत्पन्नाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. दुप्पट उत्पन्न करण्यासाठी तरतूद दुप्पट करावी लागते तरच उत्पन्न दुप्पट होते तसेच त्यासाठी उत्पादन खर्च सुध्दा निमपट करावा लागतो. आजच्या या अर्थसंकल्पात अपेक्षित अशी तरतुद आणि शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यावर भर दिलेला दिसत नाही. तोंडी सांगत आहेत की, आम्ही उत्पन्न दुपटीवर ठाम आहोत. मागील पाच वर्षापासून हे शब्द आम्ही एकत आहोत पण आजपर्यंत फक्त निराशाच पदरी पडलेली आहे. तसेच ग्रामीण भागाची आर्थिक नस असलेला आठवडी बाजार याचा उल्लेख कुठेच दिसत नाही. आपणास आठवडी बाजार बंद करायचे आहेत का? बाजारातील छोटा व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, कारागीर, मूर्तिकार, कलाकुसर करणारा यांचे भविष्य काय आहे? त्यांना आपण डिजिटल बँकेच्या माध्यमातून वित्त पुरवठा करणार अहात का? या बँका सुरू करण्याचा हेतू काय आहे? जिथे पायाभूत सुविधा धड नाहीत, कर्जापोटी आत्महात्या होतात, दरडोई उत्पन्न अत्यल्प आहे, उद्योग नाहीत, बाजार नाही अशा ठिकाणी डिजिलचा झागमगाट कशासाठी आहे. आम्ही शेतकरी आणि ग्रामीण लोक जे मागतो त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त डोळे पुसण्याचे काम ठामपणे सुरू आहे.

संजय ज्ञानोबा शिंदे
मु. पोष्ट नेकनूर, ता. जि. बीड
मो. ९८५०५२३९६९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here