अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत पालकमंत्र्याच्या साक्षीने नाशिक येथे हॉटेल ताज गेटवेमध्ये होणार सत्यशोधक विवाह

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

नाशिक- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे शनिवार दि.5 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता *महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिक चे पालकमंत्री ना. छगन भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत* तिसऱ्यादा अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे सदस्य व नाशिक शहर चे माजी उपाध्यक्ष शिशिकांत हिरवे यांची उच्चशिक्षित सत्यशोधिका ऐश्वर्या हिरवे, (BE) आणि नगरचे समाजसेवक पांडुरंग शिंदे यांचे सत्यशोधक प्रशांत शिंदे ,(MTech)   यांचा हॉटेल ताज-गेटवे नाशिक येथे सत्यशोधक विवाह सोहळा कोव्हिडं 19 च्या नियमाप्रमाणे पार पडणार आहे.
या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ ,राष्ट्रवादी चे गटनेते नगरसेवक गजानन शेलार, नाशिक समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे आणि वेध न्यूज चे संचालक योगेश कमोद उपस्थित राहणार आहेत.
फुले एज्युकेशन च्या वतीने रजिस्टर नोंदणी करीत हा 31 वा मोफत सत्यशोधक विवाह असून नाशिक शहरातील हा 4 था  सत्यशोधक विवाह होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व विवाह नाशिक मध्ये उच्चशिक्षित वधू वर यांचे मध्ये घडू लागलेत *याची सुरवात खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या घरातुन कृतीतून केली आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेबांनी सर्व समाजाचे योग्य प्रबोधन केले म्हणूनच महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचार वारसा कृतीतून पुढे येऊ लागले आहे*. हे सत्यशोधक विवाहाचे कार्य काल्पनिक मनुवादी  व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला पूर्णपणे फाटा देत  तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत लवकर पोहचेल यांसाठी फुले एज्युकेशन सातत्याने प्रयत्नशील राहील असे विधिकर्ते व अध्यक्ष सत्यशोधक  रघुनाथ ढोक यांनी सांगितले आहे.
या विवाह सोहळ्याचे आयोजन समताचे जेष्ठ सदस्य व राष्ट्रवादी ओबीसी सेल चे माजी शहराध्यक्ष शिशिकांत हिरवे व मोलाचे सहकार्य योगेश कमोद करणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here