मराठी चित्रपट वाहिनीवरील अन्य भाषेतील मराठी डब चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबविले जावे यांसाठी निर्माता महामंडळ घेणार आक्रमकतेचा पवित्रा …!

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर


दादर ;

आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.श्री. नाना पटोले साहेब यांच्या समवेत नुकतीच महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, टिळक भवन, दादर येथे संपन्न झाली या बैठकीत मराठी चित्रपट वाहिनीवरील अन्य भाषेतील मराठी डब चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबविले जावे यांसाठी निर्माता महामंडळाने आक्रमकतेचा पवित्रा घेतला असून असून त्यांच्या या उद्देशपुर्तीसाठी मी स्वतः जातीने लक्ष देईन इतकंच नव्हे तर येणार्‍या महाराष्ट्र अधिवेशनात हा गहन प्रश्न मांडून कायद्याच्या चौकटीत तो धसास लावून मराठी कलावंताना न्याय मिळवून देईन असे आश्वासन देऊन अध्यक्ष नाना पटोले यांनी आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्याची शासनदरबारी कशी पूर्तता होईल यांसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असा दिलासा दिला. याप्रसंगी श्री.देवेंद्र मोरे (संस्थापक अध्यक्ष), श्री.प्रशांत नांदगावकर, (उपाध्यक्ष), श्री.विकास पाटिल (उपाध्यक्ष), श्री.शरदचंद्र जाधव (महासचिव), श्री.मनिष व्हटकर (खजिनदार), श्री.विजय शिंदे (पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख), श्री.महेश्वर तेटांबे (संचालक), श्री.किशोर केदार (संचालक) अँड.मनिष व्हटकर (संचालक), ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर तसेच कार्यालयीन प्रमुख श्री.रुपेश शिरोळे.आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश्वर तेटांबे
संचालक, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार
अ.भा.म.चि.निर्माता महामंडळ
९०८२२९३८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here