राजुरा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕पुण्यतिथीनिमित्त मौन पाळून वाहीली श्रद्धांजली.

राजुरा :– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजुरा काँग्रेसच्या वतीने गांधी भवन राजुरा येथील काँग्रेस कार्यालयात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. पुण्यतिथीनिमित्त पुज्य बापूंना आदरांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, उपसभापती मंगेश गुरनुले, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, नगरसेवक गजानन भटारकर, साधना भाके, अँड. चंद्रशेखर चांदेकर, पुनम गिरसावडे, सागर गिरसावळे, आकाश मावलिकर, जगदिश बुटले, अरुण शेख, इर्शाद शेख, विकास देवलकर, दिलीप डोईफोडे, धनराज अवघान, यासह कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here