कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत ची १५७ प्रकरणें मंजूर

लोकदर्शन। 👉 मोहन भारती
⭕१५ प्रकरणे नामंजूर

⭕,,तालुका अध्यक्ष उमेश राजूरकर यांचा पुढाकार,,

गडचांदूर :
-संपूर्ण देशात कोरोना महामारीचे संकट पुन्हा आले असतांना निराधारांना आधार देण्यासाठी कोरपना संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय कोरपना येथे २५ जानेवारी ला बैठक संपन्न झाली.
या बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत ४७ श्रावणबाळ योजने अंतर्गत ६२ इंदिरा गांधी विधवा योजने अंतर्गत ९ इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेअंतर्गत ३५ दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजने अंतर्गत ४ असे एकूण प्रकरण १५७ मंजूर तर १५ प्रकरण नामंजूर करण्यात आले.
नामंजूर असलेले प्रकरणात ज्या काही त्रुटी असेल त्याची पूर्तता ऑनलाइन सेतूमध्ये जाऊन करावी तसेच अंध अपंग मतिमंद विधवा परितक्त्या वृद्ध सिकसेल दुर्धर आजार यांनी जास्तीत जास्त केसेस ऑनलाईन करून घ्यावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर यांनी केले
या प्रसंगी अध्यक्ष उमेश राजूरकर पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर नायब तहसीलदार प्रवीण चिडे ,अव्वल कारकून राजेश ढोबळे, निशा सोयाम, देवा थेटे ,प्रणिता मालेकर अशासकीय मिलिंद ताकसांडे, अंकुश वांढरे, कल्पना निमजे, सुहेल अली, अब्दुल हाफीज अब्दुल गणी ,प्रमोद पिंपळशेंडे, विलास आडे, अनिल निवलकर, रेखा घोडाम आदी उपस्थित होते
,,फोटो,,.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here