

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. या प्रसंगी भारत साळवे व शंकर नागपुरे यांनी देशभक्तीपर गीत गायले. याप्रसंगी सेवानिवृत्त माजी सैनिक राजेंद्र किनाके यांनी ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी पंस. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, नंदा कांबळे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, अर्चना मुळेवार, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, भाऊराव मोहजे, पुंडलिक खनके, पत्रकार सुरेश खडसे, नौशाद शेख, इम्तियाज रज्जाक, देवानंद ठाकरे,भाजपाचे संजय भोंगळे, शाम आगदारी, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, अनिल मानकर, हेमंत पाझारे, रज्जाक शेख, निरंजन नगराळे, अजय आमटे, अमोल थेरे, पुष्पा रामटेके, रेखा पाटील, सुनीता पाटील, मंगेश पचारे, गणेश खुटेमाटे, सांभशिव खारकर, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली, तुलसीदास ढवस, भारत साळवे, धनराज पारखी, दिलीप कांबळे, जनाबाई निमकर, योगिता टोंगे, अनुसया चिडे, चंद्रकला मन्ने, आशा उरकुडे, वैशाली ठमके, नजमा कुरेशी, शारदा झाडे, सुनील राम, राजेंद्र लुटे, अनिल नीत, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, शरद गेडाम, अनंता बहादे, आगलावे गुरुजी उपस्थित होते.
संचालन साजन गोहने यांनी केले तर आभार प्रदर्शन कुसुमताई सातपुते यांनी केले.