

लोकदर्शन 👉 गजानन राऊत सर
जिवती ÷भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्य महाविद्यालयात प्रथमतः श्री व्यंकटेश बहुद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाच्या उपस्थित प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम यांच्या शुभ हस्ते झेंडा वंदना चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयात कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्टॉप कॅन्सर मिशन केंद्रा द्वारे कॅन्सर अवेअरनेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टॉप कॅन्सर मिशन या संस्थेचे जिल्हा कार्यवाहक श्री अजय ठाकरे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. मोहन भारती सहसचिव तर प्रमुख अतिथी म्हणून श्री दिपक महाराज पुरी, श्री. विठ्ठल महाराज पुरी, श्री रंगनाथ देशमुख, प्राचार्या डॉ शाक्य उपस्थित होत्या. श्री. अजय ठाकरे यांनी कॅन्सर होण्याची कारणे त्याचे दुष्परिणाम व त्याला कशा पद्धतीने रोखता येईल यासंदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन करण्यात केले त्यांनी वेगवेगळ्या आभासी साधनाचा उपयोग करून कॅन्सर चे विविध प्रकार त्याचे स्तर व ते किती भयावह असते हे पटवून दिले. हा रोग नसून मृत्यू आहे व त्यापासून आपण कसे दूर राहू आपल्या सोबतच समाज सुद्धा कसा सुरक्षित ठेवता येईल या संदर्भात ही त्यांनी विस्तृत विवेचन केले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री मोहन भाऊ भारती यांनी व्यसनमुक्त व प्रदूषण मुक्त समाज घडविण्याचा प्रत्येकानी प्रयत्न करायला पाहिजे असे प्रतिपादन केले. तर देशातून कॅन्सर हद्दपार झाला पाहिजे असे मत इतर मार्गदर्शक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देशमुख राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार प्रा. राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. लांडगे, प्रा. तेलंग, प्रा. पानघाटे, साबळे, वासाडे, मस्कले, मुंडे, मंगाम तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..