इन्फंट कान्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनीची आय आय टी मुंबई येथे निवड.

By : Mohan Bharti

राईस अॅकाडमीच्या वतीने कोमल मिना चा सत्कार.

राजुरा  :– इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे सत्र २०१८- २०१९ मधील माजी विध्यार्थीनी कु. कोमल रामसिंग मीना हिने जेईई मेन्स अॅन्ड अडवान्स या दोन्ही परिक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून आय आय टी मुंबई येथे आपले स्थान पक्के केले आहे. इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेतही तीने 99.40% गुण प्राप्त केले आहेत हे विशेष.
तिच्या या यशाबद्दल कु कोमल मीना हिला इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित राईस अॅकाडमी च्या वतीने शाल श्रीफळ व ११ हजार रुपये रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. राईस अॅकाडमी ही राजुरा आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि निट परिक्षेची तयारी करण्यासाठी प्रदक्षिण देण्याचे काम करते. आज राईस अॅकाडमी च्या विद्यार्थ्यांना कोमल मीना हिने मार्गदर्शन केले. आपल्या यशाचे रहस्य समजावून सांगितले. यशस्वी होण्यासाठी आवश्यक टिप्स सांगितल्या.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अरुण धोटे, संस्थेचे संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, रामसिंग मिना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here