महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सन्मानित

By : Mohan Bharti

गडचांदूर : जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभियान अंतर्गत महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील उपक्रमशील शिक्षिका वैशाली हेपट, स्वाती केळकर,प्रांजली थेरे,प्रतिभा गेडाम,प्रा, माधुरी पेटकर यांनी विविध उपक्रम मध्ये भाग घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल बाल संस्कार समूह महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहेत. महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाच शिक्षकांना गौरविण्यात आल्याबद्दल गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे,प्रभारी सचिव धनंजय गोरे,व इतर संचालक तसेच महात्मा गांधी विद्यालय, च्या मुख्याध्यापीका तथा प्राचार्या स्मिता चिताडे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक एच, बी, मस्की,शोभाताई जीवतोडे,एम,सी,व्ही, सी,विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे तथा, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here