गडचांदूर येथे विनामास्क फिरणाऱ्या 75 नागरिकांवर केली प्रशासनाने दंडात्मक कारवाई,,                             

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, प्रशासन ने कडक निर्बंध लागू केले असताना सुद्धा बहुतेक नागरिक या नियमांचे पालन करत नाही, तेव्हा प्रशासन ने कोविड19 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणे सुरू केले आहेत,15 जानेवारी ला गडचांदूर येथील पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, व महसूल विभागाच्या वतीने शहरात विना मास्क फिरणाऱ्या 75 बेजबाबदार नागरिकांविरोधात तसेच दुकानदारावर दंडात्मक कारवाई करून 4500 रुपये चा दंड वसूल करण्यात आला, बसस्टॉप परिसरात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी मास्क नसलेल्या व्यक्तीला मास्क चे वाटप करून कोविड नियमांचे पालन करावे सर्व नागरिकांनी कोरोना चे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले,सदर कारवाई पटवारी सोहेल अन्सारी, नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रमोद वाघमारे, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here