

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕माजी आमदार संजय धोटे व जी. प. चे कृषि व पशुसंवर्धन सभापती सुनिल ऊरकुडे यांची उपस्थिती*
राजूरा:-
दि. १५/०१/२०२२ ला मकर संक्रांतिच्या पावण पर्वावर मौजा नोकरी खू. अंतर्गत शंकर देवस्थान येथे जी. प. चे कृषी व पशसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या मार्फत रू. ५.२६ लक्ष चे पेव्हर ब्लॉक व रेलिंगचे भूमिपूजन करण्यात आले.
अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनी शंकर देवस्थान ला (वर्ग क) म्हणजेच तीर्थक्षेत्र चा दर्जा नोकरी खू. चे माजी उपसरपंच वामन तूरणकर यांच्या पाठपुराव्यामुळे सभापती सुनील उरकुडे यांच्या माध्यमातून शक्य झाले. या कार्यासाठी माजी आमदार संजय धोटे यांनी सभापती उरकुडे व वामन तुरानकर यांचे अभिनंदन केले.
तसेच शंकर देवस्थान साठी पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यासाठी समोरील काळात पुरेसा निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सभापती सुनील उरकुडे यांनी दिले. तसेच शंकर देवस्थानाला मोलाचे योगदान देणारे गढचांदुर येथील प्रतिष्ठित डॉक्टर सोनटक्के व पुजारी मंगाम जी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
भूमिपूजन च्या कार्यक्रमाला प्रामुख्याने अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय धोटे, उद्घाटक म्हणून जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, प्रमुख अतिथी भाजपा कामगार नेते अजय दुबे, जिवती प. स. उपसभापती महेश देवकते, सुरेश केंद्रे, वामन तुरांकर, सतीश उपलांचीवार, मिठीलेश पांडे, डॉ सोनटक्के साहेब,निलेश ताजने, आशिष ताजने, दीपक झाडे,लताताई उईके, लक्ष्मण पेंदोर, मंगम जी, कर्णू आदे, देवराव ढोले, मारोती येरमे, अरविंद दुर्गे व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.