रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजात कोविड लसीकरण संपन्न.

By : Mohan Bharti 

आमदार सुभाष धोटे यांनी केला लसीकरण मोहीमेचा शुभारंभ.

राजुरा  :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेज राजुरा येथे संस्थेचे अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील वय वर्षे १५ ते १८ अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना कोविड-19 लसीकरणाचा पहिला डोज दिला. या लसीकरण मोहीमेसाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील आरोग्य कर्मचारी कमल केंद्रे, सपना आठवले, माधुरी बोरकुटे यांनी काम पाहिले.
या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे,रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समीर पठाण, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, प्रदीप नागोसे, भुषण चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, रवी कार्लेकर यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here