ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे आमदार सुभाष धोटे यांचे आवाहन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा — कोविड लसीचे दोन डोज घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी, तसेच ६० वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दुसरी डोज घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास १० जानेवारी पासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस देण्यात येत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्ती, आरोग्यसेवक, फ्रन्टलाईन वर्कर यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे. आज उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे जाऊन त्यांनी बुश्टर डोज घेतला. या प्रसंगी त्यांनी क्षेत्रातील नागरिकांना हे आवाहन केले आहे.
यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याची किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे. शासकीय केंद्रावर सर्व नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात येत आहे. तसेच सध्या कोव्हिड नियमावलीमुळे शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावे, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापनाने पूढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांकरीता आपल्या शाळेत लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा व १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे. कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी घेणे, प्रशासकीय नियमांचे पालन करणे आणि संबंधितांनी लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *