सेवादल मुलींच्या वस्तीगृहात वाढदिवस साजरा 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर:-सेवादल मुलींचे वस्तीगृहात विवेक मुन यांची कन्या श्रेयसी हिचा 5 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुदर्शन नैताम सर,प्रमुख पाहुणे सेवादल वसतिगृह अधिक्षिका कोमल आक्केवार,डॉ नंदकिशोर मैंदळकर,विवेक मुन,सचिन बरबतकर,जयंत सोरते, प्रवीण उरकुडे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सुदर्शन नैताम म्हणाले आपण वाढदिवस दर वर्षी घरीच करतो परंतु आज स्रेयसी हिचा वाढदिवस सेवादल मुलींच्या वस्तीगृहतील मुलींच्या समवेत मुलींना शालेय साहित्य व खाऊ वाटून साजरा करण्यात आला.भारतीय संस्कृती केक वरील दिवे त्यावर फुंकर घालून विझविण्याची नाही तर वाढदिवसाच्या शुभ दिनी दिवे उजळून औक्षण करण्याची संस्कृती आहे “वसदैव कुटुंबकम”संपूर्ण जग माझे कुटुंब आहे त्या कुटुंबाला,समाजाला आपले काही देने लागत असते.ज्या प्रमाणे राम सेतू बांधताना खारीने जो वाटा उचलला ,जी मदत केली त्या सम आपण थोडेसे का होईना समाजाचे ऋणाचे परत फेड करायचे असल्यास अनाथालय,अंधविद्यालाय,आदिवासी आश्रय,वसतिगृह,सरकारी दवाखाना,अनाथ मुलांची शाळा अशा ठिकाणी आपले वाढदिवस साजरे करावे त्यांना दिलेल्या भेट वस्तू मुले त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे मोल नसते तो आनंद पैशाने विकत घेता येत नसते वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश भेट वस्तू गोळा करणे नसून, गरजवंताना भेट वस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्या अंतरातम्यात साठविण्यासाठी असावा.असा वाढदिवस समाजोपयोगी ठरत असतो याचे समाजाने भान ठेवावे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *