राजुरा येथे स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इंटरनॅशनल ह्युमन राईट फाउंडेशन च्या वतीने स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत अनेक अडचणीवर मात करीत अनेक अनाथांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. त्यामुळेच संविधान चौक राजुरा येथे त्यांच्या प्रतिमे पुढे मेणबत्त्या पेटवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी इंटरनॅशनल ह्युमन राईट फाउंडेशनच्या तालुका अध्यक्षा पुनम गिरसावळे, उपाध्यक्षा हिना शेख, सुप्रभा कुंभारे, उज्वला काटकर, पुष्पवर्षाताई जुलमे, स्नेहा टेकाम, दिपाली तिवारी, प्रीती उपासे, सरिता गोखरे, किरण निमसरकर इत्यादी कार्यकर्त्या तसेच राजुरावाशीय नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here