

By : Mohan Bharti
गडचांदूर : महात्मा गांधी विद्या मंदिर आणि महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी,गडचांदूर येथे दिनांक ३/०१/२०२१रोज सोमवारला जापनीज इन्सेफेलाईटीस लसीकरण मोहीम राबविण्यात आली.१ते१५वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्याकरिता आरोग्य अधिकारी डॉ.ताकसांडे मॅडम . आरोग्यसेविका राठोड ताई वआरोग्य कर्मचारी वर्ग,तसेच महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्मिता चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे, महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी भालेराव ,महात्मा गांधी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री.धनराज मालेकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, , आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.