By : Mohan Bharti
गडचांदूर : महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता चिताडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच. बी. मस्की, शोभा जिवतोडे, एम,सी व्ही, सी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे,जेष्ठ प्रा. प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथी च्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राचार्या स्मिता चिताडे,यांनी अध्यक्षीय भाषणातुन आजच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन मुलींनी शिक्षण पूर्ण करून प्रगती करावी असे सांगितले, याप्रसंगी,प्रा, तब्बू शेख व प्रा,प्रगती आगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, संचालन प्रा. तब्बू शेख यांनी केले. तर आभार प्रा. मंजुषा टेकाम यांनी मानले.याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,आशा वर्कर, उपस्थित होत्या,कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिनविशेष समिती च्या सदस्यांनी तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.