भाजपा ओबीसी जागर अभियानांतर्गत चंद्रपूर येथे 1 डिसेंबर ला भव्य ओबीसी मेळावा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय धोरणामुळे महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्णतः धोक्यात आले आहे. राज्य सरकारने या प्रश्नाचे गांभीर्य विचारात घेवून जागे होण्याची अवश्यकता असतांना सरकार याकडे डोळेझाक करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याने आपले राजकीय हक्क परत मिळविण्यासाठी भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर च्या वतीने भव्य ओबीसी जागर अभियानाव्दारे ओबीसी जागर रथयात्रा काढुन ओबीसी बांधवांना दमणकारी सरकारच्या विरोधात आक्रोष करण्यासाठी जागृत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. ही जागर रथयात्रा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गावा गावातुन चंद्रपूर शहरामध्ये पोहोचली आहे.
या रथयात्रेचा समारोप भव्य ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून बुधवार दि. 01 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. चंद्रपुरातील उत्सव हाॅल, बायपास रोड चंद्रपूर येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर, भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, लोकलेखा समिती चे अध्यक्ष आ. श्री सुधिर मुनगंटीवार, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र ओबीसी मोर्चा प्रभारी श्री. संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रामिण) श्री देवराव भोगळे,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ श्री मंगेश गुलवाडे उपस्थित राहणार आहेत.
तरी या ओबीसींच्या मेळाव्यास ओबीसी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष(ग्रामिण) श्री अविनाश पाल व ओबीसी मोर्चा महानगर उपाध्यक्ष विनोद शेरकी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here