कोरपना येथे मतदानविषयक जनजागृती रॅली

By. ÷  Mohan Bharti

कोरपना –
भारतीय संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा. यासाठी १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महसूल विभाग ,कोरपना यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी कोरपना शहरातील मुख्य मार्गाने फिरून नागरिकामध्ये मतदानाविषयी जनजागृती केली. सदर रॅलीमध्ये मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, कोरपना साजाचे तलाठी प्रकाश कमलवार, वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य खडसे
व विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांचा समावेश होता. रॅलीचा समारोप तहसील कार्यालय परिसरात झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here