आपल्या शहराची शांतता आबाधित राखणे हेच आपले कर्तव्य :- विष्णु कारमपुरी ( महाराज )*

*
लोकदर्शन 👉 मोहन भारती


*सोलापूर दिनांक :- २०/११/२०२१ :-* आपण राहत असलेल्या सोलापूर शहराची शांतता आबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शांतता समिती सदस्य विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी जेलरोड पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेला शांतता बैठकीस उपस्थित शांतता समितीच्या सभासदांना व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना केले.
सोलापूर जेलरोड पोलीस स्टेशन येथे जेलरोडचे वरीष्ट पोलीस निरीक्षक श्री. शिंगाडे साहेब यांनी जेलरोड पोलीस स्टेशन येथे त्रिपुरा येथील अप्रिय घटनेमुळे उध्वबवलेल्या घटनांमुळे शहरात शांतता राखण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी जेलरोड पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षक श्री. शिंगाडे साहेब होते तर पोलीस उपनिरीक्षक श्री. बादुले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी श्री. शिंगाडे साहेबांनी त्रिपुरा येथील घटनेमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अप्रिय घटना घडल्या त्याचा आधार घेऊन ते म्हणाले आपल्या सोलापूर शहरात पूर्णपणे शांतता राखण्यात आपण सर्वांनी सहकार्य करावे. आणि जर कोणी शांततेस बाधा निर्मांण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर अशी कारवाई केली जाईल या कारवाई मध्ये कोणाचाही मुलायजा ठेवला जाणार नाही. असे म्हणाले.
यावेळी विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी आपला शहर शांतता प्रिय आहे. त्यास कुठेही तडा जाऊ देणार नाही. असा आपण सार्वांनी शपथ घेऊ या असे सर्वांना आहवान केले. आणि पोलीस अधिकारीही आम्हांस सहकार्य करावे. म्हणजे एकदी घटना घडल्यास विनाकारण निष्पाप लोकांना किंवा कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये जर एकदा कितीही मोठी व्यक्ती असलातरी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आमचा त्यास पाठींबा असेल असे म्हणाले.
सदर प्रसंगी नगरसेवक रफीक हत्तुरे, अयाज दिना (मेंबर), मतीन बागवान, मोहोळकर यांनी आपले विचार मांडून शांतता आबाधित ठेवण्याचे आहवान केले.
शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बादुले साहेबांनी आभार मानून बैठक संपल्याचे जाहिर केले. सदर बैठकीस मोठ्या प्रमाणे हिंदु – मुस्लिम बांधव उपस्थित होते.
*●◆■★★■◆◆◆◆■■■★■◆◆■◆◆*
*फोटो मॅटर :- जेलरोड पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना वरीष्ट पोलीस निरीक्षक श्री. शिंगाडे साहेब समोर शांतता समितीचे सदस्य दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here