सावित्रीबाई फुले शाळेने बांधला वनराई बंधारा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर÷गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले शाळेने कोरपना तालुक्यातील वडगाव आसन या शेतशिवारातील नाल्यावर वनराई बंधारा बांधला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांच्या मार्गदर्शनात, जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी, साठवणूक केलेल्या पाण्याचा उपयोग प्राणीमात्रांना होण्याचा दृष्टीने तसेच पाणी अडवा, पाणी जिरवा या शासनाच्या धोरणानुसार सदर वनराई बंधारा बांधण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे, जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे, सुरेश पाटील, राजेश मांढरे, राजेश वासेकर, भालचंद्र कोंगरे, सि. एम.किन्नाके, सि. जे. घाटे, एस. जी आत्राम, बापूजी मेश्राम, शशिकांत चन्ने यांच्यासह शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here