राज्यातील महाविकास आघाडी सरकार भकास – जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचा आरोप

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।

*⭕पेट्रोल डिझेल भाववाढ कमी करण्यासाठी राज्य सरकारविरूद्ध मूलमध्ये निषेध आंदोलन———————–*

मूल : १२ नोव्हेंबर २०२१,शुक्रवार…

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला. शिवाय भाजप शासीत राज्यातही कर कमी केला गेला. पण, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कर कमी केले नाही. हे सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करणारे भकास सरकार असल्याचा टिका जिल्हा परिषद अध्यक्षा तथा मूल भाजपाच्या तालुका अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी केली.
केन्द्र सरकारने दिवाळीच्या पुर्व संध्येला पेट्रोल वरील ऍक्साईज कर 5 रूपये प्रतिलीटर तर डिझेलवरील ऍक्साईज कर 10 रूपये प्रतिलिटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंन्द्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकुण करांचा परिणाम ध्यानात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल 6 रूपये व डिझेल 12 रूपये स्वस्त झाले आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पार्टी मूल च्या वतीने मागणी करण्यात आली. भाजपा मूल शहर व मूल तालुका भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रोश आंदोलन व निषेध मोर्चा आज दिनांक १२ नोव्हेंबर ला दुपारी १२.०० वाजता गांधी चौक ते तहसील कार्यालयासमोर काढण्यात आला. हे आंदोलन जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अध्यक्षा तथा मूल तालुका भाजपा अध्यक्षा सौ संध्याताई गुरनुले व भाजपा मूल शहर अध्यक्ष श्री प्रभाकर भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी उपस्थित श्री चंदू मारगोणवार सभापती पंचायत समिती, श्री प्रभाकर भोयर शहराध्यक्ष, सौ रत्नमाला भोयर नगराध्यक्ष नगर परिषद, श्री नंदू रणदिवे उपनगराध्यक्ष नगर परिषद, श्री प्रशांत समर्थ सभापती नगर परिषद, श्री बंडू नर्मलवार सरपंच उश्राला, श्री नितीन गुरनुले सरपंच फिस्कुटी, श्री गजानन वलकेवार माजी सभापती, श्री भिकारुजी शेंडे सरपंच, श्री प्रशांत लाडवे नगरसेवक, सौ विद्या बोबाटे, श्री आनंद पाटील ठिकरे माजी सरपंच, श्री विवेक ठिकरे, श्री सचिन गुरनुले युवा कार्यकर्ता, श्री प्रदीप वाढई सरपंच, श्री राकेश गिरडकर उपसरपंच, श्री तुषार ढोले, श्री दिलीप पाल, श्री संजय येनूरकर माजी सरपंच, श्री विनोद सिडाम नगरसेवक, श्री राकेश ठाकरे ओबीसी सेलचे नेते, श्री अनुप नेरलवार उपसरपंच, श्री शुभम समर्थ युवा कार्यकर्ता, श्री दादाजी येरणे, श्री अविनाश वरघंटीवर, श्री उमेश ढोले, श्री प्रमोद कोमुलवार, सौ कल्पना पोलोजवार सोशल मिडिया प्रमूख, सौ आशा गुप्ता, श्री अनिल साखरकर, सौ लिनाताई बद्वेलवार, सौ वंदना वाकडे, श्री रुपेश वाकडे, श्री मिलिंद खोब्रागडे, श्री अशोक वाकडे, श्री प्रमोद कडस्कर, श्री राहुल झोलमवार, श्री निलदेव भुरसे, श्री नामदेव खोब्रागडे, श्री संदीप गेडाम, श्री सुरज मंडलवार, श्री श्री विवेक मांदाळे, श्री सुरज मांदाळे, श्री रमेश टिकले, श्री नंदू वाढई, व संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.
यापूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी केंद्रासरकारच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या
आघाडी सरकारने कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे. हि जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापी अजुनही आघाडी सरकारकडुन टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षाची
आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाशाशी त राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही.
राज्यात डिझेलवर 24 टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो.त्या खेरीज पेट्रोलवर प्रति लिटर 9 रूपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागु केलेल्या करासाठी 3 रूपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी 30 ते 40 रूपये प्रति लिटर मिळतात. आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी 5 रूपये तर डिझेलसाठी 10 रूपये सवलत द्यावी. तसेच राज्यात दुष्काळी स्थिती नाही. त्यामुळे पेट्रोलवरील प्रति लिटर 3 रूपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी. पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न केल्यास भाजपा तीव्र आंदोलन उभारेल असे मोर्चादरम्यान सांगण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयात भाजपाच्या वतीने तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांना पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. आक्रोश मोर्चात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *