एसटी संपाला भीम आर्मीचा जाहीर पाठिंबा

By : Shankar Tadas

वरोरा : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत संपाला भीम आर्मी भारत एकता मिशनचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख शंकर मून, वरोरा तालुका प्रमुख शुभम गवई यांच्या नेतृत्वाखाली कामगार आंदोलन मंडळाला नुकतीच भेट दिली व मागण्यांबाबत संपकरी कामगारांशी सविस्तर चर्चा करून आपल्या संघटनेचा पाठिंबा जाहीर केला.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन व भत्ते अतिशय कमी असून महागाईच्या काळात एवढ्या अल्प वेतनात कामगारांना आपल्या कुटुंबाचे पालण करणे अतिशय कठीण झाले आहे.
महामंडळाचे वेतन व त्या मोबदल्यात कामगारांकडून दिली जाणारी सेवा ही तर एक प्रकारची सरकारी वेठबिगारी आहे, असा गंभीर आरोप शंकर मून यानी या भेटीदरम्यान केला. राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलीनीकरण करण्याची मागणी अतिशय रास्त असून, त्यामुळे फक्त कामगारांनाच नाही तर सर्वसामान्य प्रवाशांना सूध्दा चांगल्या सोयी मिळतील, अशी आशाही मून यांनी व्यक्त केली. शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे अशी जोरदार मागणी केली आहे.
कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्त असून त्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या भेटीदरम्यान भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे जिल्हा संघटक गौतम गेडाम भद्रावती तालुका प्रमुख अन्वर शेख, चंद्रमानी गाजबे, पिंटू मेश्राम , स्वप्नील कुंभार, योगेश खोब्रागडे यांचेसह महामंडळाचे कामगार पुढारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here