26 पानठेल्यांवर कारवाई

By : Shankar Tadas

* अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम

चंद्रपूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात 26 पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत्‍ आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागामार्फत शासकीय कार्यालये, हॉस्पिटल, शाळा परिसरातील पानठेल्यावर सदर कार्यवाही करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना तंबाखुमूळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व जाणीव होईल. तसेच नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा उद्देश सफल होईल. कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी तसेच जास्तीत जास्त लोकांना यांच्या दुष्परिणामाची जाणीव होणे हासुध्दा या कारवाईचा उद्देश आहे. यावेळी “ करा तंबाखू, सिगारेट, जर्दा याला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार ” हा कानमंत्र देण्यात आला.

सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक श्री. सातकर , पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, अतुल शेंद्रे, दुर्गाप्रसाद बनकर यांनी मोलाची कामगिरी केली

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *