भारतीय समाजमन आणि राजकारण हा खरंतर संशोधनाचा विषय. राजकिय नेत्यांच्या प्रति समाजात एक नकारात्मक भावना. अर्थात राजकारण्यांची चाल आणि चरीत्र देखील त्याला कारणीभूत आहे. परंतु राजकारणातील काही माणसे सर्वसामान्यांच्या या दृष्टिला अपवाद ठरतात. त्यांचे असणे समाजासाठी आश्वासक असते. आपल्या निरंतर कामातून ते समाजात ऊर्जा भरतात. मग राजकारणातले स्वकीय असो की परकीय. अशा अजातशत्रु राजकिय नेतृत्वाची दखल समाजाला घ्यावीच लागते.
राजकारण हा समाजकार्याचा राजमार्ग मानणारे नेतृत्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे भाऊ.. आदरणीय सुधीरभाऊ!
लोकनेते, आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडत जाणे स्वाभाविक होते. राजकारणात सामान्यांच्या प्रश्नांना समजून घेण्याची एक दृष्टी लागत असते, ती मला त्यांच्याकडून मिळाली. सर्वात महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे गेली ४० वर्षे सुधीरभाऊ राजकारणात आहेत. पण सामान्यांचे प्रश्न सोडविण्याची सुधिरभाऊंची तडफ आणि ऊर्जा तसुभरही कमी झालेली नाही.
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात ज्या त्वेषाने एकेक संसदीय आयुध वापरून ते बोलतात, त्यातून त्यांना असलेली प्रश्नांची समज दिसून येते. सामान्यांच्या प्रश्नांसाठी अग्रणी राहून आक्रमक पवित्रा घेणारे भाऊ व्यक्तिगत आयुष्यात मात्र अतिशय संवेदनशील आहेत. कोरोणाच्या या संकटकाळात ते अस्वस्थ होतांना आम्ही बघितले आहे.
ते अस्वस्थ होऊन थांबले नाहीत. तर या संकटकाळात त्यांनी खंबीरपणे नियोजन केले. शासन प्रशासनाच्या आधी सुधीरभाऊंनी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना जनसेवेसाठी व जनजागृतीसाठी कामाला लावले. शेकडो बैठका, गोरगरिबांना अन्यधान्य किट, शेकडो सॅनिटायझर मशीन, शेकडो आक्सीजन कान्संट्रेटर, लाखोंनी मॉस्क, रूग्णवाहीका, रुग्णांना आर्थिक सहाय्य अशा अनेक गोष्टींची पूर्तता व्हावी यासाठी भाऊ चोवीस तास उपलब्ध होते. मध्यंतरी भाऊंना कोरोणा झाला, त्याच्यावर मात करून ते बरे झाले. परंतु आभासी आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमांतुन सुधिरभाऊ जनसेवेत कार्यमग्न होते.
मुल येथिल आरोग्य शिबिरातला एक प्रसंग मला आठवतो, शिबिर चालू असताना एक महिला घाईघाईत शिबीर संपायच्या वेळेवर आली. तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी कॅन्सर असल्याची शक्यता वर्तवली, ही गोष्ट भाऊंना कळली. स्वाभाविकच तिची आर्थिक परिस्थिती नव्हती. नागपूर येथील उपचारासाठी तिला आर्थिक मदत केली. पण इथेच ते थांबले नाही, ती भगिनी नशिबवान होती जिला सुधिरभाऊ भेटले पण जिल्ह्यातल्या अशा असंख्य कॅन्सरग्रस्तांचं काय? हा प्रश्न सुधिरभाऊंना स्वस्थ बसू देत नव्हता. द्रष्टा नेता हा तत्कालीन प्रश्नाचे समाधान शोधून थांबत नसतो, तर तो प्रश्नाच्या समूळ उच्चाटनाचा विचार करतो. आणि सुधीरभाऊंनी नेमके हेच केले. जिल्ह्यातल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी त्यांनी १०० बेडचे अद्ययावत रुग्णालयात जिल्ह्यातचं सुरू करण्याचा त्यांनी घ्यास घेतला. त्याकामी त्यांनी श्री. रतन टाटा यांची भेट घेतली. आणि आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपुरात कॅन्सर रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे.
माझ्या आयुष्याची प्रेरणा सुधीरभाऊ आहेत. आपणास देखील त्यांच्यासारखे कार्य करता यावे हा ध्यास सतत असतो. ‘बहुत जनासी आधारू’ हे विशेषण भाऊंच्या बाबतीत चपखल बसते. महाराष्ट्रातल्या अनेकांना त्यांचा आधार आहे. मागील त्यांच्या पाच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांना श्वास घ्यायला वेळ नव्हता. अवघ्या महाराष्ट्रातली माणसे त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन सोडवणूकिसाठी गराडा घातलेली दिसायची. आज पंधरा महिने उलटूनही विद्यमान मुख्यमंत्र्यानी मंत्रालयाची पायरी चढलेली नाही. त्या पाश्र्वभूमीवर सुधीरभाऊ मुनगंटीवारांसारखे लोकनेते ठसठशीतपणे उठून दिसतात.
भाऊंचा एक गुणवैशिष्ट्य आहे, जो मला खूप भावतो तो म्हणजे पक्षीय व राजकीय मतभेदांच्या पलीकडे जावून प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन. मग भाऊंचे मंत्रालयातील दालन असो किंवा जनसंपर्क कार्यालय तिथे सामान्य नागरिकांसोबतच सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते मोठ्या विश्वासाने येतात. आणि भाऊदेखील त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचे प्रश्न, समस्या जानुन घेत त्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतांना मी कैकदा अनुभवलं आहे. भाऊंचे असे वागणे हे राजकिय हेव्यादाव्यांच्या पलिकडचे आहे. आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाला सर्वपक्षीय मान्यता आहे. हे पुन्हा अधोरेखित होते.
भाऊंच्या स्वभावाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही गोष्टीकडे ते तटस्थपणे बघतात. आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण करून आपली भूमिका मांडतात. समस्या कोणतीही असो, समाधान शोधलाच पाहिजे यासाठी भाऊ नेहमी अग्रणी व आग्रही असतात. लोकप्रतिनिधी हा लोकांच्या सेवेसाठीच असतो. हे भाऊ आपल्या कृतीतून दाखवून देतात.
त्यांच्या विकासकामांच्या झंझावाताने असंख्य युवा कार्यकर्त्यांची मांदियाळी गावागावात निर्माण झाली आहे. खेड्यापाड्यातला सामन्यांतील सामान्य कार्यकर्ता ज्या नेत्याला आपली अडचण साध्या फोनवर सांगतो, आणि त्या अडचणीच्या सोडवणुकीसाठी स्वतः लक्ष घालून जो तात्काळ पाठपुरावा करतो. तो लोकनेता दुसरा तिसरा कुणी नसून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत.
हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
राजकारणी रुक्ष असतात, त्यांना भावना नसते असली विधाने किती अर्धवट आणि तकलादू आहेत हे भाऊंच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला समजेल आणि उमगेल देखील.
संस्कृतात म्हटलं आहे,
“गगणं गगणाकारं सागरं सागरोपमः
राम रावण युद्धस्य
राम रावण युद्ध इवः |”
एखाद्या दृष्टीहिन माणसाला आकाशाची व्याप्ती कितीही समजावून सांगितली तरी ती कळणारी नाही.
ज्याने समुद्र बघितलाच नाही, त्याला त्याची खोली कळणार नाही.
श्रीराम-रावणाच्या युद्धाचा साक्षी नाही, त्याला त्याची भीषणता कळणार नाही.
अगदी त्याचप्रमाणे, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे आकाशाची विशालता, समुद्राची खोली आणि विकासाचा झंझावात तो प्रत्यक्ष त्यांच्याजवळ गेल्याशिवाय अनुभवता येणार नाही.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की असे सार्थ, समर्पक आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचे कर्तुत्वनिष्ठ आणि अजातशत्रू लोकनेते माझे मार्गदर्शक आहेत.
त्यांच्या या ५९ व्या जन्मदिनी त्यांना दिर्घार्युरारोग्य लाभो हिच माता महाकाली चरणी प्रार्थना! आणि लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना खूप खूप शुभेच्छा!
– देवराव भोंगळे
जिल्हाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर.