

By: Mohan Bharti
विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
गडचांदूर : गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर च्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्य सौ,स्मिताताई चिताडे यांच्या प्रेरणेतून निमणी येथील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप व वृक्षारोपण करण्यात आले, तसेच गडचांदूर परिसरातील गावात वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामसेवक शुभांगी ढवळे व तमुस अध्यक्ष अशोक झाडे यांच्या हस्ते निमणी ग्रामपंचायत च्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास कोंगरे ,शिक्षक संजय पोगुलवार, तुकाराम धुर्वे अंकुश काकडे , वैशाली हेपट, किरण पोगुलवार , स्वाती केळकर ,प्रतिभा गेडाम आदी उपस्थित होते. ग्रामसेवक शुभांगी ढवळे म्हणाल्या की कोरोना काळात शाळा बंद असतांना महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक शिक्षण आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत असल्याने त्यांचे कौतुक केले,कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच प्रा, उमेश राजूरकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन तुकाराम धुर्वे यांनी केले तर आभार प्रतिभा गेडाम यांनी मानले यावेळी गावकरी विद्यार्थी उपस्थित होते.