आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट ___ 

0
117

___               लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्र काकडे हिने नुकतेच आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्र बनवून भेट दिले.
आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच बिबी येथे भेट दिली असता त्यांना एका छोट्या कार्यक्रमामध्ये या तैलचित्राची भेट देण्यात आली. यावेळी कलावंत स्नेहा काकडे हिच्यासोबत तिचे वडील राजेंद्र काकडे, आई लता काकडे, मोठे वडील नत्थु काकडे, मोठी आई पुष्पा काकडे, बहीण अंकिता, भाऊ निखिल उपस्थित होते.
आमदार सुभाष धोटे हे जरी आमदार असले तरी ज्या गडचांदूर शिक्षण संस्थेमध्ये स्नेहाने शिक्षण घेतले त्या संस्थेचे ते संस्था अध्यक्ष होते. त्या कृतज्ञतेने तिने तैलचित्र तयार केल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here