💁‍♂️ सातबाऱ्याचा उतारा ! – आता बँकांमध्येही मिळणार – शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राज्याच्या महसूल विभागाने आपल्या नव्या संकेतस्थळासाठी ५२ बँकांशी करार केला – आता या बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होंणार आहे

*कोणत्या आहेत बँका ?*

● राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार – यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पंजाब व सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, सिडको-महाराष्ट्र बँक – इत्यादी अनेक बँकांचा समावेश आहे

● *तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये* – बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया – तसेच खासगी बँकांमध्ये कोटक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक आहे

● *जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये-* कोल्हापूर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, नगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, लातूर, धुळे –

● तसेच नंदुरबार, बुलढाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर आणि नाशिक या बँकांनी महसूल विभागाबरोबर करार केला आहे असे राज्य शासनाने सांगितले

*शेतकऱ्यांना सातबारा बँकांमध्येही मिळणार* – प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे ,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *