

लोकदर्शन 👉 मोहन भारती
आज गडचांदूर येथे कोरपना तालुका काँग्रेस कमिटी गडचांदूर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीन अखील भारतीय राष्टीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा युवकांचे प्रेरनास्थान भारतीय लोकांचा बुलंद आवाज खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर चे प्रांगणात संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी नगराध्यक्ष सौ सविता ताई टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमात राहुलजी गांधी व गांधी घराण्याबाबत देशासाठी बलीदान देणार्या इंदीरा गांधी ,राजीव गांधी यांच्या बाबत कार्यकरत्यांना माहिती सांगण्यात आली. येणार्या 2024 मध्ये राहुलजी गांधी हेच देशाचे पंतप्रधान होतील व भारताला महासत्ता देश म्हणुन ओळखल्या जाईल अशी ईच्छा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थीपे यांनी केली. व्यापारी संघाचे अध्यक्ष हंसराज जी चौधरी व गटनेता विक्रम येरणे यांनी काँग्रेस पक्षाच्या पुढील उज्ज्वल भविष्या बद्दल मार्गदर्शन केले. सदर वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन गरजू लोकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचे नेतृत्वात राज्यात सर्वाधिक जागा मिळवून आणि परत देशात पक्षाला सत्तेत आणून राहुल जी गांधी यांना पंतप्रधान बनविण्याचा संकल्प उपस्थित सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
कार्यक्रमास सभापती राहुल उमरे, नगरसेवक पापाय्या पोंनामवार, अरविंद मेश्राम, जयश्री ताई ताकसांडे, माजी शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे,महिला शहर अध्यक्ष अर्चना ताई आंबेकर, एन एस यु आय तालुका अध्यक्ष प्रीतम सातपुते, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अतुल गोरे, राहुल ताकसांडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन शहर अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी केले.