कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता विध्यापीठाने विद्यार्थ्यांची परीक्षा फी घेऊ नये -गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनची मागणी

By : Mohan Bharti

राजुरा-कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली विद्यार्थी व पालकांची आर्थिक व मानसिक कमकुवत स्थिती लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाने सदर काळातील परीक्षा फी घेऊ नये तसेच परीक्षा संबंधित कामाचे शिक्षकांचे प्रलंबित मानधन मिळण्याबाबतचे निवेदन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनने विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.श्रीराम कावळेआणि लेखाधिकारी तथा अधिष्ठाता डॉ.सुरेश रेवतकर यांना दिलेले आहे.कोरोना च्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ अनुदान आयोग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठांनी सत्र 2019 -20 ची उन्हाळी परीक्षा सेमिस्टर 2 व 4 च्या विद्यार्थ्यांची न घेता त्यांना पुढील वर्गामध्ये आंतरिक मुल्यमापनाव्दारे पुढील वर्गात बढती दिलेली आहे. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतलेली आहे.सत्र 20-21 मधील हिवाळी परीक्षा विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने घेतल्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत झालेली आहे.चालू सत्रातील होणारी परीक्षा देखील विद्यापीठ लवकरच ऑनलाइन पद्धतीनेच घेणार आहे व त्यासंबंधीच्या परीक्षा फी भरण्यासंदर्भात अधिसूचना विद्यापीठाने काढलेली आहे.कोरोना महामारीमुळे लाँकडाऊन असल्याने अनेक पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.अशा स्थितीत विद्यार्थ्याकडून परीक्षा न घेता फी घेणे किंवा प्रचलित पद्धतीने परीक्षा न घेता ऑनलाइन पद्धतीने कमी खर्चिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्याकडून पूर्ण फी घेणे हे नैतिक व मानवीय दृष्टीने अयोग्य आहे. करिता उन्हाळी परीक्षा 2021 करिता बसलेल्या सेमिस्टर दोन, चार व सहा च्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी ही मागील दोन्ही परीक्षा मधून समायोजित करून चालू सत्राची परीक्षा फी घेवू नये अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच
विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षेसंबंधी अनेक प्राध्यापकांचे पेपर सेटिंग, पेपर माँडरेशन व इतर विद्यापीठ कामाचे देयके सादर करून ही त्यांच्या कामाचे मानधन अजून पर्यंत प्राप्त झालेले नाही शिक्षकांचे प्रलंबित मानधन त्वरित मिळावे याकरिता संघटनेने मागणी केली असून सदर दोन्ही प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन प्र-कुलगुरू आणि लेखा अधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. शिष्ट मंडळामध्ये संघटनेचे सचिव डॉ. विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते,उपाध्यक्ष डॉ.राजुभाऊ किरमिरे,सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने, महिला आघाडी प्रमुख डॉ. लता सावरकर विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र गोरे डॉ. किशोर कुडे,डॉ.आर.एस कोल्हे,डॉ.ए. एस.लाकडे डॉ. संजय फुलझेले इत्यादी मान्यवरांचा शिष्ट मंडळांमध्ये समावेश आहे .

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *