स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्ती व प्रेरणेचे स्त्रोतच होते -हंसराज अहीर*


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- स्वातंत्राविर सांवरकरांचे जिवन सर्वांना प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग आणि सशस्त्रा क्रांतीकारकांना त्यांनी दिलेली प्रेरणा यामुळे त्यांना क्रांतीकारकाचे मुकुटमनी म्हणुण संबोधले जाते. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि वेदनादायी कारावास असह्य असा आहे. त्यांच्या जिवनापासुन प्रेरणा घेऊन आमच्यासारखे अनेक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सावरकरांनी अर्धे अधिक आयुष्य तुरूंगवास व स्थानबध्दतेत देशासाठी घालवले, अंदमान निकोबार मध्ये मरन यातना भोगल्या असे हे सावरकर व त्यांचे कुटुंब युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंती निमित्य अभिवादन करतांना आजच्या युवकांनी सावरकरापासुन राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांनी सावरकर जयंती निमित्त आयोजीत अभिवादन कार्यक्रमात केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे म्हणुनच त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही ईथे एकत्र येत असतो, त्यांनी देशाच्या बाहेर इंग्लंड मध्ये असतांनाही देशासाठी लढा दिला. विद्यार्थी, युवा व जेष्ठ अवस्थेतही त्यंानी हा लढा सोडला नाही व त्यांनी देशभक्तीचा जो परिचय दिला आहे तो आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आहे. असा देशभक्त ज्यांनी कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता देशासाठी लुटवीली त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी लोकसभेत बोलतांनाही वारंवार मागणी केलेली आहे, मा. प्रधानमंत्र्यांनी या देशभक्ताला भारतरत्न उपाधी देण्यासाठी दखल घ्यावी असेही अहीर यांनी यावेळी सांगीतले.
स्थानीक चंद्रपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चैक येथे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल फुलझेले, राजु घरोटे, नगरसेविका मायाताई उईके, नगरसेवक संदीप आवारी, राजेंद्र तिवारी, मोहन चैधरी, बाळु कोतपल्लीवार, प्रभाताई गुडधे, मायाताई मांदाडे, शशिकांत मस्के, रघुविर अहीर, अरून तिखे, राजेंद्र खांडेकर, वासु देशमुख, पूनम तिवारी, संजय खनके, गिरीष अणे, चंद्रप्रकाश गौरकार, वंदना संतोषवार, विकास खटी, सुहास आवळे, रत्नाकर जैन, संजय जोशी, रवि जोगी, रवि येनारकर, राजु वेलनकर, स्वप्नील डुकरे, दिनकर सोमलकर, मनोरंजन राॅय, गौतम यादव, राहुल बनकर, बाळु कोलनकर, धम्मप्रकाश भस्मे, स्वप्नील मुन, राहुल बोरकर यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *