——————लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕❕*भाजपा जनसंपर्क कार्यालयात स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी*

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या कार्याची व विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. अंदमानच्‍या अंधार कोठडीत असताना स्‍वातंत्र्याच्‍या विचारांचा सुर्य त्‍यांनी कायम तळपत ठेवला. भारतमातेच्‍या स्‍वातंत्र्यासाठी त्‍यांनी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत लढा दिला . त्यांच्या देशभक्तीपर विचारांचा अंगीकार करणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या १३८ व्‍या जयंतीनिमीत्‍त आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर भारतदेशासाठी कायमच विचारांचे ऊर्जापीठ राहणार आहे. दारिद्रय निर्मुलन व विषमता नष्‍ट करण्‍यासाठी त्‍यांच्‍या विचारांची आपल्‍याला सदैव गरज आहे, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.  यावेळी प्रामुख्‍याने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, अॅड. सुरेश तालवेार, राजकुमार आकापेल्‍लीवार यांची उपस्थिती होती.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंतीचा कार्यक्रम भाजपा जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्‍यात आला. यावेळी स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या प्रतिमेला आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते माल्‍यार्पण करण्‍यात आले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *