

लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर –‘
सभोवतालील गावात दिवसेन -GB दिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने नेहमीप्रमाणे पुढाकार घेत कंपनीचे युनिट हेड, श्री विजय एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाला रोखण्यासाठी सभोवतालील आवारपूर, नांदा, नोकरी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयेगाव, हिरापूर व सांगोळा अशा बारा गावात मास्क, सानीटाँयझर, आँक्सीमीटर, गन थर्मामीटर, डेटॉल साबण, सोडियम क्लोराइड व कापूर ओवा पोतली हया साहित्याचे वाटप केले. त्याकरिता गावातील सरपंच, उपसरपंच यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले.
नजीकच्या हिरापूर गावातील कोरोनाची परिस्थिती बघता तेथील सी एस आर ने गावाकडुन आलेल्या प्रत्येक मागणीला पूर्ण केले. येथील स्वयंसेवकासाठी कोरोना सुरक्षा किट वाटप केले. तसेच जिल्हा परिषद शाळेत कंपनीद्वारे सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी सुद्धा टँकर द्वारे करण्यात आली. तसेच सर्व कोविड प्रतिबंधक साहित्य सुद्धा वेळेवरती गावात देण्यात आले. हिरापूर गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले.
कंपनीचे प्रबंधक श्री संजय शर्मा व कर्नल दिपक डे यांनी सांगितले की, आम्ही गावाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहू. साहित्य वाटप करण्यामध्ये सतिष मिश्रा, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
,,फोटो,,