लोणी येथील विद्यार्थ्यांला मिळाला राजीव गांधी अपघात विमा योजना चा लाभ

लोकदर्शन 👉 मोहन भारती 👉,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मृतक विद्यार्थी प्रभात मेश्राम च्या वडिलांना देण्यात आला 75 हजाराचा धनादेश
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,
राजीव गांधी अपघात विमा योजना चा लाभ मृतक विद्यार्थी प्रभात संतोष मेश्राम चे वडील संतोष मेश्राम व आई सौ देवांगना संतोष मेश्राम यांच्या घरी जाऊन रुपये 75000/ चा धनादेश मा. सौ कल्पना पेचे ,जिल्हा परिषद सदस्य(शिक्षण समिती) यांच्या हस्ते वितरित करण्यात आला याप्रसंगी श्री उत्तमराव पेचे (माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर)मा. आनंदराव धुर्वे( गट शिक्षणाधिकारी प स कोरपना)सौ रितिका येलापुल्वार, सरपंच ,श्री अविनाश वाबिटकार, उपसरपंच लोणी, श्री घनश्याम पा नांदेकार, माजी सरपंच लोणी उपस्थित होते,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी, येथे प्रभात संतोष मेश्राम हा विद्यार्थी सन २०१९ मध्ये शिक्षण घेत असताना सर्प दंशामुळे दिनांक ३०/१०/२०२०ला मरण पावला होता .
शाळेत शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना अशा मृत्यू प्रसंगी
शासना तर्फे राजीव गांधी अपघात विमा योजनेत ७५०००हजार रुपयांचा विमा मिळतो.
सदर मुलाचा विम्याचा प्रस्ताव शाळा स्तरावरून माननीय गटशिक्षणाधिकारी प स कोरपना मार्फत माननीय शिक्षणाधिकारी प्राथ. जि प चंद्रपूर शिक्षण विभाग यांना शाळेतील मु अ श्री विनोबा आत्राम यांनी पाठपुरावा करून प्रस्तावित केला होता .
वरिष्ठांनकडून प्रस्ताव मंजूर होऊन धनादेश प्राप्त होताच दिनांक २५/५/२०२१ ला श्री संतोष मेश्राम व आई सौ देवांगणा संतोष मेश्राम त्यांच्या प्रत्येक्ष घरी जाऊन मा .कल्पनाताई पेचे* शिक्षण समिती सदस्य जी. प. चंद्रपूर श्री उत्तमरावजी पेचे* माजी शिक्षण समिती सदस्य जि. प .चंद्रपूर ,*श्रीआंनदरावजी धुर्वे* गटशिक्षणाधिकारी प.स .कोरपना यांचे हस्ते सौ, देवांगना संतोष मेश्राम याना ७५००० हजाराचा धनादेश* वितरित करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री विठ्ठल आवारी शिक्षक. श्री विनोबा आत्राम उपस्थित होते
सदर राजीव गांधी अपघात विमा योजना मिळवून देण्यासाठी विनोबा आत्राम यांनी पाठपुरावा केला होता कार्यक्रमचे प्रास्ताविक श्री विनोबा आत्राम (विषय शिक्षक) यांनी केले.
,,फोटो,,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *