👉 दि 21/4/2021 =कोरपना ,वामन अत्राम*** आदिवासी महामंडळ मार्फत आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने मागील अर्थसंकल्पात आदिवासीGB समाजाच्या कल्यांणा करीता त्यांच्या हक्काच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत त्यांच्या हक्काची योजना मिळाली नाही. मागील वर्षीच त्यांचे कागदपत्र संबंधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतले असूनसुद्धा आज दुसऱ्या वर्षाचे लाँकडावून सुरु होवून पंधरा ते विस दिवस पुर्ण झाले असून सुद्धा आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काच्या योजनेची प्रतीक्षा करावी लागत आहे. या प्रतीक्षेमुळे आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना न्याय कधी मिळणार हे सुध्दा न समजनारे कोळेच दिसु लागले आहे.या कासव गतीच्या कामामुळे महाराष्ट्र शासनावर व आदिवासी महामंडळावर समाजात नाराजी चा सुर ऐकण्यात येत आहे. कोरपना तालुका प्रतिनिधी ः वामन आत्राम