

दि 25 /3/2021 शिवाजी सेलोकर
अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केली
कोरपना :एक वर्षीपासून कोरोणाच्या महा मारीने सर्व जनता हैराण झाली आहे covid-19 लस माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशालाच नाही तर जगालाच कोविड 19 लस उपलब्ध करून दिली आहे मात्र ही लस फक्त तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी लस दिली जात आहे परंतु ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येऊन लस घेऊ शकत नसल्याने अनेक नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत मात्र ही लस प्रत्येक गावात नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोरपना तालुका भाजपा अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी कोरपणा येथे ग्रामीण रुग्णालय डॉ श्री राजुनंद गायकवाड यांना भेटून या ठिकाणी कोविड लस घेत असलेल्या नागरिकांची परिस्थिती जाणून घेतली असता 13 फेब्रुवारीला लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला आहे पहिला डोस 1490 व दुसरा डोस 516 एकूण 2006 नागरिकांनी या कोविड 19 लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा, प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा,विरूर गाळेगाव येथे 300 डोज ची व्यवस्था करण्यात आलेली आहे 60 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे तसेच 45 वर्ष वय असलेल्या रुग्णांना 20 आजार असलेल्या रुग्णांना सुद्धा लसीकरण करण्यात येत आहे एक एप्रिलपासून 45 वर्ष वयाच्या सर्व नागरिकांना सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ श्री राजूनंद गायकवाड यांनी श्री नारायण हिवरकर यांना दिली ग्रामीण भागातील नागरिकांना तालुकास्तरावर येण्यास अडचण निर्माण होत आहे ही समस्या हिवरकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर निवेदनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात लस देण्याची एक मोहीम राबवून नागरिकांपर्यंत सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी केली तसेच श्री पद्माकरजी मडावी,श्री संदीप भोयर श्री राजु येरेकर व इतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.