

आज दिनांक ८ मार्च,जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून म. न. पा. माध्यमिक शाळांनी झूम अॅप च्या माध्यमातून ऑनलाईन जागतिक महिला दिन साजरा केला. सदर कार्यक्रमाला म. न. पा. चे सर्व अधिकारी उपस्थित होते सन्मा.श्रीम. ममता राव मॅडम (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक)या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगार महिलांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. त्यात श्रीम. अपूर्वा प्रभू (सचिव,सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र,बृहन्मुंबई महानगरपालिका),श्रीम.डॉ.वंदना कारखेळे (Dysp/Acp)पुणे,श्रीम. जयश्री मुळगीर (PSI बोरिवली,मुंबई),प्रा. श्रीम. विमुक्ता राजे (प्राध्यापिका ठाणे महाविद्यालय)श्रीम. पूजा घाग(मनपा. माजी विद्यार्थिनी (समुपदेशक) श्रीम. स्वाती शिंदे (शिक्षिका )श्रीम.वनिता जगताप (माजी मुख्याध्यापिका),श्रीम. ज्योती निकम(मनपा.माजी विद्यार्थिनी,सध्या मनपा.शंकरवाडी माध्यमिक शाळेत कार्यरत आहे.) अश्या प्रकारे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपापल्या मनोगतातून आपापल्या क्षेत्रा विषयी विद्यार्थ्याना अनमोल असे मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाची शोभा वाढवली.सदर कार्यक्रम आयोजनासाठी श्रीम. सुचिता खाडे मॅडम(विभाग निरीक्षिका)यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विलेपार्ले येथील दीक्षित रोड म.न.पा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.नीता ठाकरे मॅडम(CNO) व श्री काशीपुरी गोसावी (प्रभारी मुख्याध्यापक) यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले.सदर कार्यक्रमात श्रीम. प्रज्ञा शेटये यांनी निवेदनाचे काम केले.तसेच श्रीम. कोमल जाधव मॅडम,श्रीम. गौरी शिंदे मॅडम व श्रीम. वेदा जोशी मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.कार्यक्रमाच्या शेवटी सन्मा.ममता राव (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक)यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.शेवटी आभार प्रदर्शन व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.