नेक्स्ट डेस्टिनेशन इज “ONPASSIVE”

By : Arvind Khobragade

कल्पना करा,तुम्ही दुबईत मेट्रोने प्रवास करीत आहात, आणि मेट्रोचे पुढील स्टेशन अमुक म्हणून उद्घोषणा होते, त्यात’नेक्स्ट स्टेशन इज Onpassive अशी उद्घोषणा तुमच्या कानावर आदळते. काय असेल तुमची प्रतिक्रिया?…onpassive काय आहे असा प्रश्न आपसूकच पडेल आणि मग नेटच्या दुनियेत गुगलवर ONPASSIVE सर्च केलं जाईल आणि मग जगभरातील ट्रॅफिक तुमच्या मागे येईल.एक स्वप्नवत कल्पना आता साक्षात उतरत आहे.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नवी क्रांती म्हणून ज्याची ओळख लवकर जागतिक नकाशात होईल ते आपले ONPASSIVE आता दुबईच्या मेट्रो स्टेशनवर दिमाखात विराजमान झाले आहे. कंपनीचा एक संस्थापक सदस्य म्हणून याकडे बघताना खरच अदभुत चमत्कार हाच एकमेव शब्द समोर येतो आहे. गेली चार वर्षे ज्या कंपनीच्या आगमनाची चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या जगभरातील 1429728 सदस्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या ONPASSIVE करिता 7 जानेवारीची रात्र चमत्कारिक होती.कंपनीची वाटचाल आता ऐतिहासिक वळणावर आली असून यापुढील काळात संस्थापक सदस्य आणि आंतरराष्ट्रीय नेट वापरकर्ते आता एका नव्या दुनियेची सफर लवकरच करतील यात शंका नाही.
त्यासाठी दुबईत झालेली नवी घडामोड समजून घेणे आवश्यक आहे. दुबई हे आंतरराष्ट्रीय शहर दररोज जगातील विविध देशातील लाखो लोक या शहरात मुशाफिरी करत असतात. त्या स्वप्नवत दुबईत ONPASSIVE स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मेट्रो ही दुबईची दळणवळण वाहिनी. दररोज 7 लक्ष लोक या मेट्रोने प्रवास करतात. त्यासाठी 53 वेगवेगळे स्टेशन मेट्रोचे असून त्यातील एक स्टेशन आता पुर्णतः ONPASSIVE स्टेशन झाले आहे. दुबईतील RTA(रस्ता आणि परिवहन प्राधिकरण)हे या मेट्रोचे नियंत्रण करते. त्यांनी दुबई इंटरनेट सिटी हे मेट्रो स्टेशन खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यासाठी जाहिरात प्रक्रिया सुरू केली.दुबईत जगभरातील वेगवेगळ्या कंपनी असतानाही त्यात ONPASSIVE ने यात बाजी मारत पुढील 10 वर्षासाठी या स्टेशनची लिलाव प्रक्रिया आपल्या ताब्यात घेत आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडवून दिली. यापुढेही 10 वर्ष हे स्टेशन ONPASSIVE स्टेशन म्हणून मिरवणार आहे. संपूर्ण स्टेशन परिसरात आता ONPASSIVE चा डंका राहील.900 पेक्षा जास्त डिजिटल जाहिराती आणि 1000 पेक्षा जास्त बॅनर आणि फ्लेक्स ONPASSIVE ची सफर घडवून आणतील.दररोज 7 लाख प्रवाशी तेही आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले ONPASSIVE च्या जाहिराती बघतील. याची डोळ्या त्याचा अनुभव घेतील.ही काय कंपनी आहे म्हणून गुगलवर सर्च करतील. कल्पना करा, जगातील विविध देशातील प्रवाशी जेव्हा ONPASSIVE हे काय आहे म्हणून सर्च करतील तेव्हा ती ट्रॅफिक आपल्याकडे येईल.
कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी किती दमदार आहे हे यातून स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका जागतिक शहरातील एक मेट्रो स्टेशन पुढील दहा वर्षे आपल्या ताब्यात घेण्याची ही प्रक्रिया म्हणजे आपली कंपनी कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे हे एव्हाना लक्षात आले असेल.
जेव्हा एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट बाजारात येण्यासाठी पूर्णपणे सज्ज असते,तेव्हाच कोणत्याही कंपनीचा मार्केटिंग विभाग जाहिरातीवर करोडो रुपये गुंतवणूक करीत असतो.दुबईत आज झालेली ही गुंतवणूक हे स्पष्ट करते की आता ONPASSIVE आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. O-Mail, O-NET, O-TRIM हे प्रोडक्ट आता तयार आहेत तर लवकरच O-Connect आपली प्रतीक्षा संपवून जागतिक पातळीवर दमदारपणे प्रवेश करणार आहे. दुबईतील घडामोड हे स्पष्ट निर्देश करते आहे की आता Win It to Win It साठी सज्ज व्हा.
भारतातील 6 लाख पेक्षा जास्त संस्थापक सदस्यांना ही खुशखबर असून आपण आता अंबानी-अडाणी-मित्तल या भारतीय धनाढ्य कंपनीच्या तुलनेत असलेल्या कंपनीचे सदस्य आहोत यावर विश्वास ठेवावाच लागेल.भारतातील एखाद्या शहरातील मेट्रो स्टेशन ची लिलाव प्रक्रिया झाली तर वर उल्लेखित अदानी-अंबानी किंवा मित्तल हेच दावेदार असतील.आता आपण त्याच तोडीचे,किंबहुना आंतरराष्ट्रीय शहरातील एका मेट्रो स्टेशन चे पुढील दहा वर्षाचे हक्कदार झालो आहोत. म्हणजे आपले बाजारमूल्य आता वाढले आहे.एखादी कंपनी जागतिक पातळीवर गुंतवणूक करते तेव्हा ती कंपनी बाजारातील संपूर्ण बाजारपेठ कवेत घेण्यासाठी सज्ज होत असते.आपली ONPASSIVE आता त्याच दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
मित्रानो,गेली चार वर्षे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे, आता आपली गुंतवणूक जागतिक झाली असून आपण जागतिक कंपनीचे संस्थापक सदस्य असल्याचा अभिमान वाटावा अशी आपली वाटचाल असली पाहिजे. मनातील किंतु परंतु आता संपले असुन आपलेही “नेक्स्ट डेस्टिनेशन ONPASSIVE ” हेच राहणार आहे. सर्वांना शुभेच्छा.
(ता, क-महाराष्ट्रातील हजारो संस्थापक सदस्यांच्या मनातील भावना मराठीतून व्यक्त करण्यासाठी हा विशेष लेख आहे. शेअर करून आपणही आता कंपनीला वैश्विक रूप देण्यासाठी सहकार्य करा. आपल्या सदस्यांना तर कंपनी माहीत आहे, इतरांनाही आता ONPASSIVE समजावून सांगण्यासाठी सज्ज व्यक्त व्हा. हा लेख शेअर करा.)

अरविंद खोब्रागडे, चंद्रपूर
9850676782
(ONPASSIVE Founder Member/Brand Ambessader)

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *