अंबुजा फाटा येथे ‘विकेल ते पिकेल’ योजना

By : Shivaji Selokar, Gadchandur
कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ येथील सरस्वती शेतकरी महिला गटामार्फत अबुंजा फाटा येथे भाजीपाला विक्री चा स्टाल लावण्यात आला. महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’या सकल्पनेवर आधारित संत सिरोमणी सावता माळी रय्यत बाजार अभियान अतर्गत भाजी पाला विक्री च्या स्टाल चा शुभारंभ राजूरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी गोंवीद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळणार आहे. जे शेतकरी स्वतःहून पालेभाज्या, फळे, ग्राहकांना बांधावर विक्री करतात, त्यांच्यासाठी विक्री व्यवस्था उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. याप्रसंगी कोरपना तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले, कृषी साहाय्यक धनंजय भगत, बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख,कृषी मित्र किशोर निब्रड,अंबुजा फाऊंडेशन चे सिद्दु जपलवार व सरस्वती शेतकरी महिला गटाच्या सिताबाई आस्वले,छाया निब्रड, रसिका काकडे आदी महिला शेतकरी उपस्थित होत्या.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *