तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.

0
50

लोकदर्शन 👉 मोहन भारती
सिंधी, धानोरा, टेंभुरवाही, विरूर स्टेशन आणि परिसरातील नागरिकांच्या नुकसानीची केली पाहणी.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यात २२ ते २३ जुलै रोजी अतीपृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज राजुरा तालुक्यातील सिंधी परिसरातील शेतशिवारी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच धानोरा, टेंभुरवाही, विरूर आणि परिसरातील अतिवृष्टीने प्रभावित क्षेत्राचे अवलोकन केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचे जे सी बी लावून लेवल करण्यात येईल व परिसरातील शेतकरी, नागरिक यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसानीचे भरपाई तातडीने करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. या प्रसंगी सिंधी ग्रामपंचायतचे वतीने जिल्हाधिकारी यांना शेतजमीन, पिकांचे झालेले नुकसान लवकरात लवकर भरपाई देण्याचे आणी सिंधी ते विरुर स्टेशन रस्ता दुरवस्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधीकारी मोरे साहेब, तहसिलदार हरिष गाडे, प.स. सदस्य कुंदाताई जेनेकर, उपसरपंच रामभाऊ ढुमने, अविनाश जेनेकर, राजु मोरे, मंगेश रायपल्ले, गुलाब धानोरकर, संजय ढुमने, मंगेश जेनेकर, ओंकार मोरे, भाष्कर मोरे यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here