ईडीचा अनिल देशमुखांना दणका ! तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त*

0
100

Lokdarshan 👉By Mohan Bharti
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केली आहे. सुरुवातीला देशमुख यांची चार कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता ईडीने देशमुख यांची तब्बल ३५० कोटींची संपत्ती जप्त केल्याचे समोर आलं आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या पत्नी आरती देशमुख आणि प्रिमियर पोर्ट लिंक्‍स प्रायव्हेट लिमिटेडच्या संपत्तीचाही समावेश आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावले होते. मात्र त्यांनी हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here