बळीवंश फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

0
84


गडचांदूर, =लोकदर्शन 👉 मोहन भारती ,
संपूर्ण भारताला इंधनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी स्थापन केलेल्या कोरपना तालुक्यातील एकमेव बळीवंश फार्मर प्रोड्युसर कंHCCपनी लि, कोरपना च्या गडचांदूर येथील कार्यालयाचे उद्घाटन 9 जून ला स्थानिक बस स्थानक जवळ असलेल्या भैरव कॉम्प्लेक्स मध्ये पत्रकार प्रा, अशोक डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले,
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मराठा सेवा संघ चे नेते हरिश्चंद्र थिपे होते,प्रमुख पाहुणे म्हणून तालुका संघर्ष समिती चे संघटक उद्धव पुरी, कंपनी चे संचालक विलास कुडे,नामदेव ठेंगणे,विजय डाहूले, अशोक एकरे,बॅंक व्यवस्थापक राठोड,इंजिनिअर गणेश निमजे,संतोष पाल,कैलास म्हस्के,प्रविण चनेकर,अक्षय कुडे,अंकुश बरबटकर,चंद्रकांत पांडे,मोहनदास वाभीटकर,रेखाताई कुडे,उपस्थित होत्या,
सर्वप्रथम क्रांतिसूर्य बिरसा मुंडा,छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता मा जिजाऊ,पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला उपस्थित अतिथीनि पुष्पहार अर्पण करून, द्वीप प्रज्वलन करून अभिवादन केले,
शेतकरी उत्पादक कंपनी असलेली बळीवंश फार्मर प्रोड्युसर कंपनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारी,युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारी असून शेतकऱ्यांनि मोठ्या प्रमाणात कंपनी चे सभासद होण्याचे आवाहन कंपनी चे संचालक विलास कुडे यांनी केले,उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नामदेवराव ठेंगणे यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here