गडचांदुर येथील प्रभाग दोन मधे जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपन करण्यात आले

0
80

————————————–,————————*गडचांदुर* – वृक्ष हे मान वी जिवनात खुप महत्वाचे आहे.
संपुर्ण जिवनसृष्टिला प्राणवायु देण्याचे पवित्र कार्य वृक्ष करीत असते.वृक्षापासुन अनेक औषधित व इतर कामात उपयोग होतात. परंतु आधुनिक काळात मानवाला नैसर्गिक संसाधनांचा विसर पडत चालला आहे याची प्रचीती आपणास महामारी संकट समयी येत आहे.जो प्राणवायु आपणास वृक्षापासुन मोफत मीळतो तो पैशाने मीळणे कंठींण झाले आहे. हे आपण बघतच आहोत.वृक्ष लागवड ही आज काळाची गरज आहे.
झाडे हि पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक समजुन गडचांदुर येथील प्रभाग क्र दोन चे नगरसेवक अरविंद डोहे यांनी पुढाकार घेवुन साईशांती नगर टिचर काॅलनीत जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले.व ज्या ठीकाणी वृक्ष लागवड केली त्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्याच घरवाल्यानी स्विकारली त्यामुळे जास्तीत जास्त झाडे जगतील असा विश्र्वास दर्शविला.सदर वृक्षारोपन करताना भाजपाचे शहर अध्यक्ष सतीशजी उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,संदिपजी शेरकी,हरीशजी घोरे,प्रतीक सदनपवार,सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ कीरण सदनपवार,सौ सुवर्णा कावटकर,सौ वर्षा आत्राम,सौ कल्पना वरारकर,सौ रेखा शिंदेकर,सौ शेंडे ताई,माजी सभापती महेंद्रजी ताकसांडे,विनोद क्षिरसागर,
विजय पोतनुरवार,संतोष लांडे,सुनिल जोगी,दत्तु पानघाटे,ओम क्षिरसागर आदि उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here